आजचा दिवस कसा जाईल?
4 ऑगस्ट 2024, रविवार.
मेष रास
आज तुम्हाला प्रत्येक कामात गोपनीयता ठेवायची गरज आहे. तुमचे मूड्स बदलत राहतील. स्त्रियांचा ओढा आकर्षक दिसण्याकडे जास्त असेल. मित्र कोण, शत्रू कोण, हे ओळखावे लागेल. जे काही होईल त्यात न अडकता “घडते ते घडू दे” असा विचार केल्यास दिवस शांततेत जाईल. तुमचे प्रेम आणि आपुलकी इतरांना जाणवेल.
वृषभ रास
आज झालेल्या कामाचा आढावा घ्या. घर असो अथवा इतर कोणतेही काम, प्रत्येक काम संयम ठेवून करावे लागेल. पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारावर तुमच्यासाठी काय वर्क करते आणि काय करत नाही असा अभ्यास स्वतः बाबतीत करावा लागेल. पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. आजच लगेच पैशासंबंधी कामे होणार नाहीत.
मिथुन रास
आज तुमची उत्सुकता, एखादा इंटरेस्ट, तुम्हाला भांडणाच्या भोवऱ्यात ओढून नेऊ शकतो. मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. स्कूल, कॉलेजमधून कंप्लेंट येऊ शकते. कानावर आलेल्या प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवल्यास नुकसान होईल. गॉसिप पासून लांब रहा.
कर्क रास
आज कौटुंबिक सुखाचा लाभ घेता येईल. पुनर्विवाहाचा विचार करू शकता. त्या दृष्टीने एखादे प्रपोजल येऊ शकते. मुलांशी संबंधित आनंददायक बातम्या कळतील. दत्तक घेण्यासाठी विचार करता येईल. तशा प्रकारच्या घटना घडू शकतात.
सिंह रास
आज लपून छपून सुख घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. आज सुख मिळेल. स्वतःसाठी खरेदी होऊ शकते. जगाला दाखवताना एक आणि करताना, वागताना दुसरे च! असे तुमचे वागणे असू शकते. प्रत्येक गोष्ट आनंद घेणे, लाभ घेणे, भोग घेणे, या दृष्टिकोनातूनच घडताना दिसेल.
कन्या रास
आज तुम्ही भीती, काळजी, चिंता, लपवल्यापेक्षा त्यांना खुलेपणाने बोलून टाका. अडचणीतून मार्ग मिळेल. वरवरचा उपाय शोधण्याच्या प्रयत्नात वेळ जाईल. टेन्शन दूर करण्यासाठी चहा, कॉफी, तसेच इतर नशा करणाऱ्या चुकीच्या पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो.
तुळ रास
आज “डिप्लोमसी” तुमच्या कामाला येईल. एखाद्या गोष्टीची नकारात्मक बाजू तुमच्या समोर येईल. तुमचा प्रभाव इतरांवर पडेल. पूर्वाभास होतील. कामासंदर्भात काही चांगल्या घटना घडतील. आज आलेल्या प्रपोजल चा विचार करा.
वृश्चिक रास
आज भाग्य साथ देईल. बऱ्यापैकी अडचणीतून सुटका होईल आणि मदत मिळेल. गोल्ड तसेच इतर धातूमध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता. रस्त्यात पैसे सापडण्याचे योग आहेत. एखाद्या व्यक्तीच्या तोंडून अनमोल सल्ला, मार्गदर्शन, उपाय मिळू शकतो.
धनु रास
आज तुम्ही ठरवाल ते करून दाखवणार. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल आणि तुमचा सल्ला, मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्हाला डिमांड असेल. एखादी अद्भुत घटना पाहण्याचा किंवा अनुभवण्याचा योग आहे. आज कोणत्याही कामासाठी एखादा उद्देश शोधण्याचा तुमचा प्रयत्न असू शकतो.
मकर रास
आज मौज मजेत अडथळे येतील. कामात मदत मिळणार नाही. टीम मेंबर्स सोडून जातील अथवा ते कामात मदत करणार नाहीत. मैत्रीमध्ये काही गैरसमज, अडचणी येतील. एखाद्या गोष्टीचे सेलिब्रेशन पुढे ढकलले जाईल.
कुंभ रास
आज एक उत्साह आणि शिस्तबद्धपणा तुमच्यामध्ये सर्वांना दिसेल. बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. बोलण्यात वेळ वाया घालवू नका. गाड्यांची देखभाल, दुरुस्तीचा विचार करू शकता. गाड्यांचे सर्विस सेंटर, गॅरेज, इत्यादिचे काम असेल तर लाभ मिळेल.
मीन रास
आज स्वतःचा विचार स्वतःच करणे गरजेचे असेल. इतरांना काही न सांगता स्वतःच एखादा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. काही कामांना संध्याकाळ नंतर केल्यास ते यशस्वी होतील आणि लाभही मिळेल. पोटात दुखणे, भूक न लागणे असे त्रास होऊ शकतात.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
++++++++++++++++++++++++++++++












