प्रहार इफेक्ट
राजापूर (प्रतिनिधी) एकीकडे सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलची स्वप्ने पाहणाऱ्या राजापुरकरांच्या पदरी आरोग्य सेवासुविधांबाबत कशी िनराशा आहे ही बाब दै. प्रहारने ओणी येथील प्राथमिक अारोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेवर बोट ठेवून उघड करताच सुस्तावलेल्या आरोग्य प्रशासनाला जाग आली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत अारोग्य िवभागाने या शवविच्छेदन गृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडी पूर्णपणे साफ करून रस्ता सुस्थितित करून मोकळा केला आहे.
राजापूर तालुक्यातील रूग्ण सेवेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मृत्यूनंतरही एखाद्या रूग्णाच्या मरणयातना संपत नाहीत अशी परिस्थिती शविवच्छेदन गृहांबाबत िनर्माण झाली आहे. राजापूर ग्रामीण रूग्णालयातील शवविच्छेदन गृहाचे काम सुरू असल्याने सध्या शवविच्छेदनासाठी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ठेवले जात आहेत. मात्र या शवविच्छेदन गृहापर्यंत मृतदेह नेणाऱ्यांना आणि त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी जाणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तेथे पोहचण्यासाठी यातायात करावी लागत आहे.
ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या या शवविच्छेदन गृहाबाहेर व रस्त्यावर वाढलेली झाडी, रस्त्यावर पसरलेला चिखल यामुळे डॉक्टर आणि कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी पोहचावे लागत होते. याबाबत दै. प्रहारने वृत्त प्रसिद्ध करून या दुरवस्थेला वाचा फोडली होती. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य प्रशासनाने ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृहाकडे जाणारा झाडे आणि वेलींमुळे गडप झालेला रस्ता सर्व झाडे आिण वेली बाजुला करून मोकळा केला आहे. तर रस्त्यावर पसरलेल्या िचखलाचे साम्राज्य बाजुला करून रस्त्याची सफाई करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे. त्यामुळे उिशरा का होईना आरोग्य िवभागाला जाग आली आिण शवविच्छेदन गृहाकडे जाणारा रस्ता मोकळा झाला. यामुळे रुग्णांतून समाधान व्यक्त होत आहे. अशीच जागरूकता आिण तत्परता प्रशासनाने तालुक्यातील आरोग्य सेवा सुधारण्याबाबत दाखवावी. तसेच सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न दाखवणाऱ्या आिण श्रेयासाठी धडपडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील आरोग्य सेवेच्या उणिवांकडे जरा उघड्या डोळ्यांनी पहावे अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.












