लांजा (प्रतिनिधी) शहरातील कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे रक्तदान शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
दिलसे फाउंडेशन, तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट को क्रेडिड सोसायटी च्या वतीने आणि रेड क्रॉस इंडिया रत्नागिरीच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या डेंगूच्या साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव असून प्लेटलेट ची कमतरता असल्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी मल्टीस्टेट सोसायटीचे भूषण भोसले, योगेश गुरव, प्रसाद ढेपे, प्राजक्ता कनावजे यांनी विशेष मेहनत घेतली











