बोटीवर पाकीस्तानी नागरिक असल्याचा खोटा मेसेज व्हायल केल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

विजयदूर्ग पोलिस स्थानकात तक्रार

देवगड :प्रतिनिधी
विजयदूर्ग मध्ये हाजी अली नौकेवर पाकीस्तानी नागरिक असून शेळ्यांची वाहतुक इराणमध्ये करीत असल्याचा खोटा मेसेज सोशल मिडीयाद्वारे व्हायरल करून अफवा पसरविल्याबद्दल विजयदूर्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार २० एप्रिल रोजी घडला.
याबाबत विजयदूर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि २० एप्रिल रोजी विजयदूर्ग किल्ल्लयासमोर समुद्रात हाजी अली जहाज आले असून या जहाजावर पाकीस्तानी नागरिक आहे.तो उडवाउडवीची उत्तरे देत असून जहाजामधून शेळ्यांची वाहतुक इराणमध्ये होत आहे असा खोटा मेसेज सोशल मिडीयाद्वारे व्हारल करण्यात आला.हा मेसेज विजयदूर्गमधील नागरिक व पोलिस पाटील यांच्यापर्यंत पोहचला.अशाप्रकारे खोटा मेसेज सोशल मिडीयाद्वारे व्हारल केल्याप्रकरणी विजयदूर्ग पोलिस स्टेशनचे पो.कॉ.श्रीनाथ जयसिंग जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट- पोलिस अधिनियम ३७(१) (एफ) कलम १३५ अन्वये अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तपास अेपीआय भारतकुमार फार्णे करीत आहेत.