कुळवंडी मध्ये घरफोडी अज्ञात चोरट्यावर गुन्हा

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील कुळवंडी जांभुळवाडी येथील बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून घरा मधील १३ हजार ३५० रुपयांचे ऐवज चोरून नेल्याची घटना ३ आगस्ट रोजी उघड झाली या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणी ओंकार अनिल कदम वय २०वर्षे सध्या रा स्वामीसमर्थ कॉलनी संजना हाईट्स रुम नं ०३ पहिला मजला वेरळ ता खेड यांनी तक्रार दाखल केली आहे
हा प्रकार

२८ जुलै ते ३ ऑगस्ट सकाळी ०९.३० वा चे मुदतीत कुळवंडी जांभुळवाडी (तिसंगी फाटा) ता खेड येथे घडला .यातील फिर्यादी यांचे राहते घराचे दर्शिनी दरवाजाचे व त्याच्या बाहेर असलेल्या सेफ्टी डोअरचे कुलुप व कोयंडा कोणत्यातरी लोंखडी हत्याराने तोडुन घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या १० हजार रुपये किंमतीचा व्ही यु कंपनीचा ३५ इंची स्मार्ट एल.ई.डी. टी व्ही , ३ हजार रुपये किंमतीचे एच.पी कंपनीचे एक अर्धवट गँसने भरलेली सिलेंडर टाकी व एक रिकामी सिलेंडर ३५० रुपये किंमतीची लोंखडी कोयती आदी साहित्य चोरून नेले