खेड (प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, चिपळूण, संगमेश्वर येथे कै. सौरभ हरिश्चंद्र नाचरे यांच्या स्मरणार्थ सह्याद्री कुणबी संघ पुणेतर्फे सह्याद्री ग्रंथालय हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर तर्फे खेड व दापोली तालुक्यातील अनुक्रमे पाच हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तक भेट देण्यात आली
तिसरा कार्यक्रम पन्हाळजे हायस्कूल या ठिकाणी झाला. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक महाले, सहकारी शिक्षक तांबे, ग्रामपंचायत सदस्य संतोष हरावडे, संजय शिगवण, जानू पाटील, संजय जाधव उपस्थित होते. चौथा कार्यक्रम होडखाड हायस्कूल येथे झाला. हायस्कुलचे संस्था खेड संचालित न्यू इंग्लिश स्कुल तुंबाड या ठिकाणी झाला. यावेळी मुख्याध्यापक प्रशांत खेडेकर, सहकारी शिक्षक जाधव, पावळे, तुंबारे, घोलप, सरपंच बंडू कदम, तुकाराम कदम, किरण कदम, योगेश बिर्जे उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर खेड, दापोली, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.









