दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ

नामदार नाना शंकर शेठ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य

विद्यार्थ्यांनी 8 ऑगस्ट पर्यत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

अमित खोत | मालवण : दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण, यांच्यावतीने नामदार नाना शंकर शेठ यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजन करण्यात आले आहे.

दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्यावतीने नामदार नाना शंकर शेठ यांची पुण्यतिथी रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत साजरी केली जाणार आहे. यानिमित्त तालुक्यातील दैवज्ञ समाजातील दहावी, बारावी, पंधरावी, डिप्लोमा, डिग्री किंवा कोणतीही शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा सन 2023 – 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपली नावे विश्वास कांदळगावकर (०२३६५ -२५२६१४) यांच्याकडे दिनांक 8 ऑगस्ट पर्यंत कळवावीत आणि प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या सत्कार स्विकारावा. असे आवाहन दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.