उरण व धारावी येथील हत्ये प्रकरणी शासनाला दिले निवेदन
दापोली | प्रतिनिधी : दापोली येथे सकल हिंदू समाज बांधवांतर्फे उरण आणि धारावी येथील हत्या प्रकरणी सरकारला निवेदन देण्यात आले आहे.
दापोली तालुका सकल हिंदू समाजाच्या तर्फे सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी दापोली तहसीलदार कार्यालय येथे मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या प्रसंगी उरण येथील यशश्री शिंदे आणि धारावी येथील अरविंद वैश्य यांच्या निर्घुण हत्ये प्रकरणी शासनाने सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कडक कारवाई करावी. पिडितांना तातडीने योग्य न्याय मिळावा तसेच अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेच्या जिहादींना शासन होण्या संदर्भात सरकारनं योग्य पाठपुरावा करावा असे निवेदन आज दापोली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य देण्यात आले. याप्रसंगी दापोली तालुका सकल हिंदू संघ जातील बहुसंख्य बांधव उपस्थित होते.












