काम बंद आंदोलनाचा खेड शहराला फटका

 

खेड (प्रतिनिधी)
काम बंद आंदोलनामुळे खेड नगर परिषद मधील प्रशासकीय कामे ठप्प झाली  मंगळवारी खेड नगर परिषद मधील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले त्यामुळे. पाणी पुरवठा विभाग व अग्नीशमन वगळता सर्व विभागाची कामे ठप्पे झाली.
न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी मंगळवारी  काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे अनेक विविध मागण्या प्रलंबित आहेत. विविध समस्या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. मात्र, त्या वर्षानुवर्षे सुटत नसल्या कारणाने शेवटी महाराष्ट्र राज्य न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानंतर लॉंग मार्च व शेवटी प्राणांतिक उपोषण अशा पद्धतीने टप्या टप्प्याने कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.