रत्नागिरी : होप फाउंडेशन, फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी या विभागातील प्राध्यापक गिरीश गोविंद भिडे हे पीएचडी पदवीसाठी पात्र झाले आहेत.
प्रा. गिरीश गोविंद भिडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, रायगड येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशन विभागात ‘ॲनालिसिस, सिम्युलेशन अँड डिझाइन ऑफ मायक्रो-स्ट्रीप पॅच अँटेना यूझिंग सुटेबल कॉम्प्युटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिकस मेथड’ या विषयावर पीएचडीचा शोध प्रबंध सादर केला आहे. सदर प्रबंधाची ओपन डिफेन्स परीक्षा दिनांक ८ जुलै २०२४ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, रायगड’ येथे घेण्यात आली.
या संशोधन प्रकल्पासाठी गाईड म्हणून डॉ अनिल बा. नांदगावकर व डॉ. संजय ल. नलबलवार यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.












