खेड बसस्थानकातील उपहारगृह बंदावस्थेत

प्रतिनिधी l खेड : खेड बसस्थानकातील उपहारगृह सद्यस्थितीत बंदावस्थेत आहे. आधीच्या ठेकेदाराने बिल थकवल्याने गेल्या वर्षभरापासून उपहारगृह बंद असल्याची बाब समोर आली आहे.. बंदावस्थेतील उपहारगृहामुळे चालक- वाहकांसह प्रवाशांची हेळसांड सुरू आहे.
गेल्या वर्षभरापासून उपहारगृह बंद आहे. आधीच्या ठेकेदाराने बिल थकवल्याने उपहारगृहाला कुलूप
लावण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली आहे. उपहारगृह बंद असल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव तोंडावर येवून ठेपलेला असतानाही उपहारगृह खुले होण्याची सूतरामही ‘ शक्यता नाही. यामुळे चाकरमान्यांची कुचंबणा होणार आहे. एसटी प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन उपहारगृह प्रवाशांसाठी खुले करण्याच्यादृष्टीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.