पॅनेल प्रमुख श्री राजन कोरगावकर
सिंधुनगरी l प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी निवडणूक 14 मे रोजी होणार असून या निवडणुकीत भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व राहिल असा विश्वास भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल प्रमुख श्री राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस श्री सचिन मदने,महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे श्री अनंत राणे, जिल्हासरचिटणीस श्री सुहास सावंत,महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी पवार, जिल्हासरचिटणीस श्री शिवाजी गावीत,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री भालचंद्र जोईल, जिल्हासरचिटणीस श्री दिलीप मस्के,कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक संघटनेचे श्री किशोर कदम, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ महाराष्ट्र चे श्री दत्तराज फोंडेकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 14 मे रोजी जाहिर झाली असून या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर केंद्रप्रमुख सभा, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब महासंघ, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ या प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्यामाध्यमातून निवडणूक लढवणार आहेत.या पॅनेलचे पॅनेल प्रमुख म्हणून शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस श्री राजन कोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे.एकूण 15 जागांसाठी निवडणूक होणार असून भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल चे तालुकासर्वसाधारण क्षेत्र उमेदवार कुडाळ- श्री विजय सावंत, कणकवली-श्री श्रीकृष्ण कांबळी, मालवण-श्री मंगेश कांबळी, वेंगुर्ला -श्री सिताराम लांबर, दोडामार्ग- श्री महेश काळे, सावंतवाडी- श्री गोविंद शेर्लेकर, देवगड- श्री संतोष राणे, वैभववाडी- श्री संतोष मोरे हे उमेदवार निश्चित करण्यात आले असून जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र पुरूष- श्री नारायण नाईक व श्री संतोष राणे, जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र महिला -सौ ऋतुजा जंगले व सौ समिक्षा परब, जिल्हा इतरमागास प्रवर्ग-श्री महेंद्र पावसकर, जिल्हा अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग-श्री चंद्रसेन पाताडे,जिल्हा भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्ग-श्री संजय पवार हे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ श्री देव रवळनाध मंदिर ओरोस यैथे करण्यात आली.यावेळी सर्व उमेदवार उपस्थित होते.गेली 25 वर्षे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे वर्चस्व प्राथमिक शिक्षक पतपेढीवर राहिलेले असून विद्यमान संचालक मंडळाने विविध सभासद हिताच्या योजना राबवून स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे संस्थैला सन 2022-23 या आर्थिक वर्षांत निव्वळ साडेसहा कोटीचा नफा झाला आहे.
विरोधकांच्या कोणत्याही भूलथांपांना बळी न पडता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक सभासदांनी बहुमताने भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्वच्या सर्व 15 उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावे असे आवाहन श्री राजन कोरगावकर यांनी केले.