दोडामार्ग l सुहास देसाई :सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष 2023 – 24 मध्ये घेण्यात आलेल्या युवा संदेश प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परिक्षेत जि. प.पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर घोटगेवाडी ता.दोडामार्ग मधील कु. यशवंत शाबी यशवंत तुळसकर इयत्ता – ४ थी ह्याला गोल्ड मेडल मिळाले त्याच्या या यशाबद्दल कणकवली येथे झालेल्या युवा संदेश प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात मेडल रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व भाषा मंत्री ना.दिपकभाई केसरकर , आमदार नितेशजी राणे ,जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री निलेशजी सांबरे, युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संजना सावंत युवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री संदेशजी सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते
तसेच या वर्षी झालेल्या ए .पी.जे. अब्दुल कलाम परीक्षेतही त्याने दोडामार्ग तालुक्यात तृतीय क्रमांक व ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत सिल्वर मेडल मिळविलेले आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे










