कणकवली : नारायण राणे यांच्या रूपाने हक्काचा खासदार येथील जनतेने निवडून दिला आहे. ते ऋण फेडण्यासाठी आम्ही तयार आहोत.आज १२ रेल्वेस्टेशन आम्ही सुशोभित केली. रेल्वे प्रशासनाने एवढीच परवानगी दिली होती. उर्वरित परवानगी द्या. छोटी मोठी रेल्वे स्थानके सुद्धा सुशोभित करू देवू.कोकण रेल्वेने सुधारणा करण्यासाठी रेल्वे स्थानका बाहेरील जागेची परवानगी दिली तशी
आतील रेल्वे प्लॅटफॉर्म वरील कामाची परवानगी दिली तर एक वर्षात रेल्वे प्लॅटफॉर्म चे ही काम करू.असा विश्वास बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
समाज मनाचे प्रतिबिंब कुठे उमटू शकेल अशा १२ रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण आम्ही केले.
काँग्रेस पक्ष गिरीबी हटविणार असे जाहीर नामे प्रत्येक निवडणुकीत करते मात्र त्यात काहीच केले नाही आणि निवडणुका संपली की तो जाहीरनामा प्रिंट मिस्टेक होता असे सांगून दिशाभूल करायचे काम केले मात्र मोदी सरकार आणि राज्याचे महायुती शासनाने जे ठरविले ते सामान्य जनतेसाठी करून दाखवले आहे.
कणकवली रेल्वे स्थानकावर काम करतांना अनेक अडचणी आल्या.कारण काम करताना रेल्वेचे सिग्नल यंत्रणा बिघडतात नये याची काळजी घेणे गरजेचे असते.मात्र येवढे सर्व करून काम होत असेल तर त्यावर तंगडी टाकणारे अनेक असतात. मात्र आम्ही थांबणारे नाही.












