ग्रामपंचायत पाटपन्हाळेची आठवडा बाजारात धडक कारवाई

 

पाटपन्हाळे (वार्ताहर) गुहागर तालुक्याची मोठी बाजारपेठ असणाऱ्या शृंगारतली येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरविला जातो. या बाजारात अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात. बाजारात सामान विक्रीकरिता येणारे व्यापारी त्यांचे दुकान लावण्याकरिता रस्त्यालगत असणाऱ्या पेवर ब्लॉक वर सलई ठोकून मोठे दगड बांधून त्यावर प्लास्टिक टाकत असतात सतत सलई मारून रस्त्यावरील फ्लेवर ब्लॉक तुटले आहेत. तर काही दुकानदार आपली दुकाने रस्त्याच्या अगदी जवळ लावत आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे ग्रामपंचायत पाटपन्हाळे च्या वतीने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला असून घंटागाडीवर ध्वनी पेक्षकाच्या माध्यमातून प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन देखील केले जात आहे. आजच्या मोहिमेत आठवडा बाजारातील दुकानदारांना प्लास्टिक पिशवी न वापरण्याचे आवाहन केले गेले व दुकानात असलेल्या प्लास्टिक पिशव्या तसेच रस्त्यावर मारण्यात येणाऱ्या सलई जप्त करण्यात आल्या रस्त्यावर आलेली दुकाने मागे करण्यात आले असून रस्ता मोकळा करण्यात आला.

यावेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, ग्रामविकास अधिकारी बडद मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी,आदी ग्रामस्थ उपस्थित होते