रिफायनरीचे सर्वेक्षण होणार म्हणून ग्रामस्थांनी बारसू सडयावर ठोकला तळ

प्रांताधिकाऱ्यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. यासाठी या परिसरामध्ये माती परिक्षण व सर्व्हेक्षणाबाबत शासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. मात्र याबाबत शासनाकडून अधिकृत काहीच जाहिर करण्यात आलेले नसतानाही सोमवारी या परिसरातील प्रकल्प विरोधी ग्रामस्थांनी बारसू सड्यावर एकत्र जमत रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. दरम्यान खबरदारी म्हणून प्रशासनाने रविवार पासून या परिसरात लागू केलेल्या 144 कलमाचा या ग्रामस्थांनी भंग केल्याने आता पोलीस प्रशासन या बाबत काय कारवाई करते हे देखील पहावे लागणार आहे.

दरम्यान अशा प्रकारे बारसू सडयावर ग्रामस्थ जमा झाल्याचे कळताच राजापूर प्रांताधिकारी वैशाली माने व तहसिलदार शितल जाधव यांनी या ठिकाणी जात ग्रामस्थांशी संवाद साधला. सर्वेक्षणाबाबत अद्याप कोणताही आदेश नसून प्रकल्पाबाबत जे काही काम केले जाईल ते सर्व स्थानिक जनेला विश्वासात घेऊनच केले जाईल. तर जिल्हाधिकारी देखील गावांमध्ये बैठका घेऊन आपल्याशी संवाद साधणार आहेत व आपले म्हणने एकूण घेणार आहेत तरी आपण अशा कडक उन्हात या सडयावर बसू नये असे आवाहन माने यांनी यावेळी केले. मात्र स्थानिक ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचे प्रांताधिकारी माने यांनी सांगितले.

येत्या काही दिवसांमध्ये बारसू-सोलगाव परिसरामध्ये माती परिक्षणासाठी ड्रिलींगचे काम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मे अखेरपर्यंत या परिसरात मनाई आदेश जारी करण्यात आहे. प्रत्यक्षात माती परिक्षणासाठी ड्रिलींगचे काम कधी सुरू होणार याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही.

असे असतानाही व मनाई आदेश असतानाही सोमवारी या परिरसताली काही ग्रामस्थ, महिला यांनी सडयावर येऊन ठाण मांडले असून रिफायनरी विरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान तीव्र उन्हाळा असल्याने जनतेने असे करू नये, उन्हात थांबू नये यासाठी व अशा प्रकारे कोणतेही सर्वेक्षण सुरू झालेले नाही याची माहिती देत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रांताधिकारी माने व तहसीलदार जाधव यांनी या ग्रामस्थांची बारसू सडयावर जाऊन भेट घेतली संवाद साधला. मात्र प्रशासनाचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर आंम्ही आमच्या निर्णयावर ठाम असून आंम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

प्रांताधिकारी यांनी प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय असो तो स्थानिकांना विश्वासात घेऊनच घेतला जाणार असून खुद्द जिल्हाधिकारीही आपल्याशी संवाद साधणार असल्याची माहिती यावेळी माने यांनी दिली. मात्र तरीही ग्रामस्थांनी आपली भूमिका कायम ठेवली.

दरम्यान अशा प्रकारे 144 कलम जारी असतानाही एकत्र जमत या कलमाचे उलंघन केल्याने पोलीस प्रशासन या बाबत काय कारवाई करते हे देखील पहावे लागणार आहे.

सत्यजित चव्हाण, मंगेश चव्हाणला न्यायालयीन कोठडी

दरम्यान, प्रस्तावित भू सर्व्हेक्षणाला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मिडीयाव्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देऊन दखलपात्र गुन्ह्याचे योजना आखत असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने सत्यजित चव्हाण आणि त्याला मदत करणारा मंगेश चव्हाण या दोघांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 153(1) प्रमाणे रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कलम 151(3) प्रमाणे येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली.

पोलीसांकडून बारसू, सोलगाव परिसरात सशस्त्र संचलन

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत व सर्वेक्षणाबाबत शासन स्तरावरून हालचाली सुरू झाल्या असून पोलीस प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सोमवारी पोलीसांनी धोपेश्वर, पन्हळे तर्फे राजापूर, गोवळ, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे, सोलगाव या भागांमध्ये रूट मार्च करण्यात आले. वरिष्ठ पोलीस