खा. नारायण राणे व सौ. निलम राणे यांनी घेतले सिध्दीविनायकाचे दर्शन

माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा खासदार सन्माननीय नारायणराव जी राणे साहेब व सौ निलम (वाहिनी) राणे यांनी आज दादर येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात विघ्नहर्ता, लंबोदर श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, समाधान नांदो, असे साकडे बाप्पाचरणी घातले.

कोकणासह राज्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कार्यक्षम राहण्यास बाप्पाचे आशीर्वाद सदैव माझ्या व पक्षातील सहकाऱ्यांच्या पाठीशी राहो अशी प्रार्थना केली.