राजापूर (वार्ताहर): ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्हयांच्या कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) या शिखर संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी अनिल नवघणे (रायगड) यांची निवड झाली आहे.
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत सन २०२४ ते २०२९ सालाकरता नविन कार्यकारणी निवडण करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी उदय कटे (माणगांव), शंकरराव म्हसकर (रोहा), बबन उंडरे(म्हसळे), अॅड.अवधूत तोरस्कर (राजापूर) यांची तर सरचिटणीस पदी कृष्णा वणे (गुहागर) यांची निवड करण्यात आली.
सहसचिव पदी रविंद्र कुडतरकर (रत्नागिरी), माधव कांबळे(गुहागर), प्रमोद खेराडे (दापोली), संजय उमासरे( महाड पोलादपूर) यांची तर खजिनदारपदी महेश शिर्के (म्हसळे) यांची निवड करण्यात आली.
तर संघ कार्यकारिणीत सदस्य म्हणून शाखा राजापूरच्या वतीने चंद्रकांत बावकर,मधुकर तोरस्कर ,अरविंद डाफळे ,अनिल भोवड, अॅड. अवधूत तोरस्कर, अशोक वालम यांची तर संघ प्रतिनिधी सदस्य म्हणून सोनू ठुकरूल, प्रभाकर वारिक, दीपक नागले व रविंद्र नागरेकर यांची निवड करण्यात आली आहे.










