मंडणगड/ प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथप्रदर्शन आयोजित करून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस सहा. प्रा. मंगेश ठसाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सहा. प्रा. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
यावेळी ग्रंथपाल डॉ. दिगंबर हेमके यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर त्यांनी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जीवन प्रवास विशद करून कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ठ केली.
सदर ग्रंथप्रदर्शनात कथा, कादंबरी, ऐतिहासिक, चरित्रात्मक, आत्मचरित्र, वैचारिक, व्यक्तिमत्व विकास, करिअर व स्पर्धा परीक्षा, राजकीय, सामाजिक व्यक्तींचा प्रवास उलगडणारी आदी पुस्तकांचा समावेश या ग्रंथप्रदर्शनात दिसून आला. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. दिगंबर हेमके व ग्रंथालय कर्मचारी प्रीती तांबे यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने या कार्यक्रमास उपस्थित होते.











