लांजा Breaking : चिरावाहतुक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू

 

दाभोळे मार्गावरील तळवडे गावच्या तिथे रेल्वे ब्रिज येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) भरधाव वेगाने चिरा वाहतूक करणारा ट्रक रेल्वे ब्रिजवर जाऊन धडकल्याने या अपघातात ट्रक चालकासह क्लिनर असा दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास लांजा दाभोळे मार्गावर तळवडे गावातील रेल्वे ब्रिज जवळ घडला आहे .
याबाबतची माहिती तळवडे पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांनी लांजा पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक कमलाकर भागप्पा केंगार (वय २८ राहणार पांडोझरी, तालुका जत जिल्हा सांगली ) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक( केए २८ डी ५३१२) घेऊन चिरा घेऊन चालला होता. दिनांक सोमवार दिनांक १२ रोजी राठोड साडेआठच्या सुमारास लांजा ते दाभोळे मार्गावर तळवडे गाव हद्दीतील रेल्वे ब्रिजवर रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक चालक कमलाकर केंगार याने ट्रक चालवून रेल्वे ब्रिजवर धडकला. या अपघातात चालक कमलाकर केंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम गेजगे (वय १७ राहणार सदर, बोबलाड, तालुका जत जिल्हा सांगली) अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला .
या अपघाताची नोंद यांचा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघात प्रकरणी ट्रक चालकावर भारतीय न्या.सं. 2023 चे कलम १०६(१), 281 125 (अ), 125 (ब), ३२४ (३) मोठा वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे अधिक तपास करत आहेत.