चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पाग विद्यालयामध्ये रोटरी क्लब चिपळूण यांचे मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. गोविंदरावजी निकम तसेच सरस्वतीचे पूजन करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर, सचिव राजेश ओतारी तसेच सदस्य असिफ पठाण, नितीन देवळेकर, प्रकाश लटके, प्रोजेक्ट चेअरमन समीर मेमन तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सीमा चाळके व पोषण आहार कमिटी सदस्या सौ. प्राची कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आला.
यावेळी अविनाश पालशेतकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना रोटरी क्लबचे कार्य तसेच विविध शैक्षणिक कार्याची माहिती दिली व विविध गरजांसाठी रोटरी क्लब सदैव तयार असेल अशी ग्वाही दिली. यावेळी सीमा चाळके यांनी विद्यालयातील विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक शैलेश सुर्वे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.












