खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील मोहाने-तळवाडी येथील गेली अडीच वर्षापासून विंधनविहीर बंदावस्थेत होती. याप्रश्नी ग्रामस्थांच्या मागणीनंतर माजी आमदार संजय कदम यांनी पुढाकार घेतल्याने विंधन विहीरीची दुरूस्ती करण्यात आली आहे.
विंधन विहीर बंद असल्यामुळे गेली अडीच वर्षे ग्रामस्थांना पावसाळ्यात नदीचे गढूळ पाणी प्यावे लागत होते. ही व्यथा ग्रामस्थांनी माजी आमदार कदम यांच्याकडे मांडताच समस्या सोडवण्यासाठी तातडीने पुढाकार घेतला. याप्रसंगी सुरेश कदम, रूपेश मोरे, सुनील सोंडकर, सचिन बनगरे, सनी बनगरे, सचिन शिंदे, विशाल चिकणे, गणेश मोरे, निलेश मोरे, श्याम मोरे, पोलीस पाटील चिकणे, ग्रामपंचायत सदस्य अनंत मोरे आदी उपस्थित होते.










