खवले मांजर तस्करी, संशयितची जामीनावर मुक्तता

 
खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे. येथील काळकाई मंदिराजवळील खवले मांजर तस्करीप्रकरणातील सहभागीअसलेल्या दत्ताराम शामा कोंडके
या संशयितास सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
खवले मांजर तस्करीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने तिघांना जेरबंद केल्यानंतर आणखी एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील सहभागी संशयित पसार झाला होता. वनविभागाचे पथक गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व पथकाने महाड येथील राहत्या घरातून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. अटकेनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.