सावंतवाडी । प्रतिनिधी : तळवणे ग्रामपंचायत येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तळवणे सरपंच गोविंद केरकर यांनी तळवणे गावातील माजी सैनिक रामदास सिताराम कांबळी यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला. माझी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने उपस्थित ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त करीत सरपंचांच्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी तळवणे सरपंच गोविंद केरकर,उपसरपंच रामचंद्र गावडे, ग्रामपंचायत सदस्य सावळाराम घाटये, सिद्धार्थ मठकर, सिद्धेश कांबळी , सौ.सोनम पोळजी, सौ.जान्हवी बर्डे, सौ.देविका बर्डे, सौ.रेश्मा टाककर,सौ.निकिता पालव,ग्रामसेवक सौ.स्वप्ना बगळे,माजी पंचायत समिती उपसभापती संदिप नेमळेकर,माजी उपसरपंच दत्ताराम बर्डे, पोलीस पाटील महादेव केरकर, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष विजय रेडकर,तळवणे गावातील सर्व जि.प.शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच आरोग्य कर्मचारी ए.पी.जंगम, तळवणे तलाठी सजा कोतवाल , शासकीय कर्मचारी ,ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका व आशा सेविका व मदतनीस व शाळेतील मुले उपस्थित होती.
ध्वजारोहणानंतर शाळेतील मुलांनी सुस्वरात राष्ट्रगीत व समुहगीत सादर केले. यावेळी उपस्थितांना खाऊ वाटप करण्यात आले. अशाप्रकारे ७८ वा स्वातंत्र्यदिन तळवणे ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.












