खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या.
यामध्ये इ. ७वीतून अक्षरा धनावडे, रूई प्रसादे, समर्थ झांजे यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. इ. ८वीतून आर्या तांबे, पार्थ डेरवणकर, लावण्या म्हामुणकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांना संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. एस. एस. अली यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.









