मेष रास
आज प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाची स्थिती असेल. काम जॉब करिअर व्यवसायात पार्टनरशिप ची ऑफर मिळेल. पार्टनरशिप मध्ये फायदा होईल. प्रेम आणि लग्नाचे प्रपोजल देण्या घेण्यासाठी विचार करू शकता.
वृषभ रास
आज बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. तुमच्या थंड प्रतिक्रियेमुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. पती-पत्नीमध्ये वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन रास
आज दिवस शांततेत घालवा. कोणत्याही प्रकारची ऑफर किंवा विशिष्ट योजना तुम्हाला आवडणार नाही. एखादी संधी हातातून जाऊ शकते. जीवनाकडे बघण्याचा कल उदासीनतेचा असू शकतो. ध्यान आणि प्रार्थना करण्याने दिवस आनंदात जाईल.
कर्क रास
आज तुमच्या सोबत अन्याय झाला असे सतत वाटत राहील. इतरांसोबत योग्य प्रकारची वागणूक ठेवा. हार्मोनल इम्बॅलन्स तसेच डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. सरकारी कामे होणार नाहीत. ठरवलेल्या मीटिंग कॅन्सल होऊ शकतात.
सिंह रास
आज मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे आवडते आणि बऱ्याच दिवसापासून करण्याची इच्छा होती त्या गोष्टीसाठी वेळ काढण्याची गरज आहे. मुलांची संबंधित चांगल्या बातम्या कळतील. अध्यात्मिक साधनेसाठी चांगला काळ. सूचक स्वप्न पडतील.
कन्या रास
आज भरपूर काम करा. नवीन कामाच्या ऑर्डर्स मिळतील. नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी आणि चांगले रिटर्न्स मिळतील. एखादे काम अचानक अर्धवट सोडून जावे लागू शकते. प्रत्येक बाबतीत पूर्व तयारी करून पुढे गेल्यास दिवस उत्तम जाईल.
तुळ रास
आज कोणी विरोध केला की तुम्ही पटकन माघार घेऊ शकता. वाद विवाद टाळण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. स्वतःचे म्हणणे जिथे खरे असेल तिथे लढण्यासाठी उभे राहण्याची गरज पडेल. कामे न झाल्यामुळे आणि विरोध सहन करावा लागल्यामुळे एक प्रकारची उदासीनता जाणवे ल.
वृश्चिक रास
आज कामाची घोडदौड पुढे न्या. भराभर कामे करावे लागतील ठरवल्यानुसार वेळेत कामे पूर्ण होतील. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रभावी राहील. इतरांवर तुमची छाप पडेल. दूरदृष्टीने निर्णय घेतल्यास फायदा होईल.
धनु रास
आज संघर्षातून यश मिळेल. एखादी व्यक्ती तुमची चेष्टा करत असेल तर त्याला योग्य भाषेत समज द्या. स्वतःच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन काही गोष्टी करू नका. साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये पुढे जाऊन अडचणी आणि आव्हान निर्माण होतील.
मकर रास
आज योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. शारीरिक गोष्टींकडे लक्ष द्या. हेल्थ ची काळजी घ्या. तसेच लाईफस्टाईल मध्ये बदल करण्याची गरज आहे. तुमचे मन भौतिक गोष्टींमध्ये जास्त अडकलेले राहील त्यामुळे माणुसकीच्याही पुढे तुम्ही पैशाला नेऊन ठेवू शकता.
कुंभ रास
आज तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळेल. घर तसेच इतर ठिकाणी सहकार्य मिळेल. नवीन संधी मिळतील. पैशाची कामे होतील.
मीन रास
आज प्रवासाचे योग आहेत. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास यश मिळेल. बऱ्याच दिवसापासून ची एखादी इच्छा पूर्ण होईल. एखाद्या स्त्रीकडून लाभ होईल.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++++++++++++++±++++++












