शहरात खळबळ: टिआरपी येथील घटना
रत्नागिरी : शहरानजिकच्या टिआरपी येथे शहरातील एका तरुणाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याचा सुमारास ही घटना घडली.
शहरातील मुरुगवाडा येथील सुरेंद्र राजेंद्र कीर ३८ या तरुणाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता टीआरपी पुलाखालील रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली. या मार्गावरून जाणाऱ्या ट्रेनची धडक बसल्यानंतर त्या तरुणाच्या शरीराचे तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळतात ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शरीराचे विखुरलेले अवशेष एकत्र करून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या बहिणीला फोन करून त्या तरुणाने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. त्याची शोधाशोध सुरू असतानाच त्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला. या आत्महत्यांची नोंद ग्रामीण पोलिस येथे सुरू होती केली आहे.











