मौजे. तळसर येथे गवारेडयाच्या हल्ल्यात श्री. तुकाराम बडदे गंभीर जखमी

रत्नागिरी | प्रतिनिधी : मौजे तळसर, ता. चिपळूण येथील गुरववाडी येथे 23 मार्च रोजी तुकाराम बाळू बड सकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरात पुजा करणेसाठी जात असताना गवारेडयने अचानक हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले.

त्यांना तेथील ग्रामस्थानी तात्काळ उपचाराठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल केले असल्याबाबची माहिती दुपारी १.१५ वा दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. सदर माहितीच्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण श्रीमती राजश्री चं. कीर तसेच वनपाल चिपळूण व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी दवाखान्यात जावून डॉक्टरांची भेट घेवून माहिती घेतली. श्री. तुकाराम बाळू बडदे यांचे उजव्या कानाच्या पाठीमागे गव्याचे शिंग डोक्यामध्ये घुसून गंभीर दुखापत झाली आहे व सद्यस्थितीला श्री. तुकाराम बाळू बडदे हे बेशुध्द अवस्थेत असून औषधोपचार चालू आहेत.

व सद्यस्थितीला श्री बडदे यांची प्रकृती स्थिरावस्तेत आहे तसेच उपस्थित असलेल्या गावचे पोलीस पाटील श्री. कदम व ग्रामस्थ यांचेशी या घटनेबाबत माहिती घेतली असता सदर व्यक्तीस गवारेडयाने हल्ला करून गंभीर जखमी केले असल्याचे सांगितले व श्रीम.कीर यांनी ग्रामस्थांशी व श्री बडदे यांचे कुटुंबियांशी चर्चा करुन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व झालेल्या घटनेबाबत चर्चा केली.

सदर घटनेचा तपास विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, व मा.सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), रत्नागिरी (चिपळूण) श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती.राजश्री चं. कीर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण, व त्यांचे अधिनस्त वनपाल चिपळूण श्री. दौलतराव भोसले, वनरक्षक राहूल गुंठे, वनरक्षक राजाराम शिंदे हे करत आहे. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.