खेड(प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे केंद्रीय न्याय व सामाजिक मंत्री रामदास आठवले २४ ऑगस्ट रोजी खेड मध्ये येणार असून त्यांचा कोकण विभागाच्या वतीने जाहीर सत्कार व कार्यकर्ता मेळावा खेड येथे होणार आहे. कोकण प्रदेशच्यावतीने खेड येथील हॉटेल बिसू येथे दुपारी सोहळा पार पडणार आहे.
याबाबत ची माहिती रिपाइंचे कोकण प्रदेशचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी याबाबत ची माहिती पत्रकार परिषदेत दिली. २४ रोजी सकाळी ११ ३० वाजता आगमन होणार असून शहरातील विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत त्या नंतर मंजूर ३ कोटी ५० लाख रुपयांचे मंजूर झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन चे भूमीपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे तसेच भरणे येथील युवक प्रांत पक्ष कार्यालय याचे उदघाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे त्या नंतर ते भरणे नाका येथील आयोजित मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला पालक मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम, खासदार सुनील तटकरे , विद्यमान आमदार योगेश कदम, रिपाइं नेते अविनाश महाते कर पपु कागदे, चंद्रकांता कांबळे, अभताइ सोनावणे , गौतम सोनावणे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ना. रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी कोकण प्रदेशचे अध्यक्ष प्रकाश मोरे, कोकण युवक अध्यक्ष कोकण संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रितम रूके तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड जिल्हासरचिटणीस आदेश मर्चंडे,खेड तालुका अध्यक्ष संतोष कापसे तसेच त्यांचे सर्व जिल्हा पदाधिकारी , आदी प्रयत्नशील आहेत.












