महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी आश्वस्त केल्यानंतर अरविंद येलवे यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण स्थगित
मंडणगड | प्रतिनिधी – मंडणगड तालुक्याचे विकास प्रश्न सोडवले जावेत व पायाभुत सुविधांची वानवा दुर व्हावी या करिता स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय मंडणगडचे आवारात मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे व सचिव रोशन रजविलकर हे आपल्या पाठीराख्यासंह उपोषणास बसले होते. दुसऱ्या दिवशी दिनांक 16 ऑगस्ट रोजी तहसीलदार श्री. गुरव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता महाडकर, ठेकेदार श्री. राजमाने यांनी उपोषणकरत्यांचे मागणी मान्य करून पुढील कार्यवाही आठ दिवसात पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण एक दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे.
प्रशासन वा संबंधीत यंत्रणानी उपोषणाच्या माध्यमातून अधोरेखीत करण्यात आलेल्या समस्या मार्गी न लावल्याने अरविंद येलवे व रोशन रजविलकर यांनी उपोषण सुरु केले होते. दरम्यान तालुक्यातील बहुतांश राजकीय पक्ष, सामाजीक संघटना, व्यापारी संघटना व व्यक्तिंनी उपोषणकर्त्यांचे भेट घेत उपोषणास पाठींबा दर्शविला.
तालुक्यातील आंबडवे लोणंद या एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे निर्मीतीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्या सोडवून गणेशोत्सवाचे आधी हा रस्ता खड्डेमुक्त व्हावा या मागणीसाठी संघर्ष समितीच्यावतीने तहसिलदार मंडणगड यांच्याकडे निवेदन सादर करुन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता या समस्यांवर यंत्रणेने तहसिल कार्यालयाने उपोषण सुरु होण्याआधी सर्व संबंधीतांची सभा आयोजीत करुन तोडगा न निघाल्याने समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणास बसलेले आहेत, तुळशी घाटात संरक्षण भिंत बांधणे. पावसात खचलेला रस्ता सुधारून देणे. रस्त्यावरील खड्डे बुजवून देणे. रस्त्याला पडलेल्या भेगा सुस्थितीत करून देणे. पावसात रस्त्यावर साचलेला चिखल दूर करून देणे. गटार लाईन सुस्थितीत करून देणे. रस्त्यावरील साईड पट्टी चांगल्या दर्जाची करून देणे. रस्त्यावर डायवर्शन फलक लावणे. किल्याच्या बाजूस संरक्षक भिंती बांधणे, या विषयांकरिता समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे व कार्यकर्ते यांनी उपोषण सुरु केले.
यावेळी आपल्या मागण्यासंदर्भात संबंधीत यंत्रणा कामे पुर्ण केल्याची चुकीची माहीती देत दिशाभुल करीत असल्याची माहीती उपोषणकर्ते अरविंद येलवे यांनी पत्रकारांना दिली व दोन दिवसांनी मार्गाच्या कामाला सुरवात न झाल्यास स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.












