खेड (प्रतिनिधी) “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,हे प्याल्यानंतर कोणताही मनुष्य गुरागुराल्याशिवाय राहत नाही, या शिक्षणाची सुरवात आंगणवाडीपासून होते,अंगणवाडी म्हणजे शिक्षण क्षेत्रातील पहिली पायरी आहे,म्हणून आंगणवाडीला विशेष महत्त्व आहे,” मांडवे आंगणवडी नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मांडवे सरपंच सुनिता कासार म्हणाल्या.
आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नातून हे अंगणवाडी इमारतीचे स्वप्न साकार होत आहे, असे ही पुढे बोलताना त्या म्हणाल्या.*स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून मांडवे गावं कमिटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक गजानन मोरे यांच्या हस्ते मांडवे आंगणावडी नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी माजी सरपंच व तंटामुक्ति अध्यक्ष सुरेश मोरे,माजी सरपंच, नामदेव जाधव,ज्ञानेश्वर जंगम,श्रीमती शारदा मोरे, उपसरपंच किशोर सणस ग्रामसेवक दीपक कदम, अंगणवाडी सेविका वामने,
ग्रामस्थ, सर्व शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते












