बामणोली पूर्व तांबेवाडी येथे ५ रोजी “वेगळं व्हायचंय मला” या नाटकाचे सादरीकरण

Presentation of the play “Vegalam Vyachanya Mala” on 5th at Bamanoli East Tambewadi

चिपळूण | वार्ताहर : तालुक्यातील बामनोली येथील शिवशक्ती तरुण मित्र मंडळ पूर्व तांबेवाडी यांच्यावतीने गुरुवार दिनांक ५ मे रोजी सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून “वेगळ व्हायचे मला” या नाट्यप्रयोगाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी काहीतरी वेगळ रसिकांना देण्याचा प्रयत्न ते करीत असतात. सांस्कृतिक मुलांचे कार्यक्रम असो बहुरंगी नमन असो किंवा नाटकाचे सादरीकर असले तरीही या ठिकाणी विविधता दिसून येते. वेगळ व्हायचे मला एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक असून हा नाट्य प्रयोग दिनांक ५ रोजी होणार आहे याच दिवशी सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ ते ३ महाभंडारा, दुपारी ३.३० ते ५ वाजता हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ६ ते ७ स्थानिक भजने, रात्री ९ ते १० वाजता सत्कार सोहळा, व रात्री १०.३० वाजता वेगळ व्हायचे मला.. या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होईल. तरी या कार्यक्रमाला सर्व भाविक आणि रसिकानी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवशक्ती तरुण मित्र मंडळ पूर्व तांबेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.