श्रावणी तिसऱ्या सोमवारी तेरवण-मेढे नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

 

सभा मंडपासाठी मदत करण्याचे आवाहन 

 

दोडामार्ग l सुहास देसाई :तालुक्यातील प्रसिद्ध पांडवकालीन नागनाथ मंदिरातआज श्रावणी तिसऱ्या सोमवार असल्याने सकाळीच भाविकांची गर्दी मोठी गर्दी झाली होती या परिसरातून तसेच गोवा बेळगाव व चंदगड तालुक्यातील भाविक मोठ्या श्रध्देने येतात या ठिकाणी नवस, एकादशमी श्रावण महिन्यात फेडले जातात तर आज नारळी पौर्णिमा असल्याने मोठ्या प्रमाणात उत्साह भाविकांचात दिसून येत होता मंदिर परिसरात देवस्थान समितीचे पदाधिकारी यांनी चोख व्यवस्था केली होती मंदिर परिसरात देवस्थान समितीचे वतीने भव्य मंडप उभारण्यात येत असून यासाठी भाविकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे तसेच राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी धार्मिक स्थळासाठी विकास निधी तून मंडप उभारण्यात यावा यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्याला लवकर मान्यता मिळून लवकरच निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे

श्रावणी सोमवार असल्याने कसई दोडामार्ग येथील कसईनाथ डोंगरावर सकाळ पासून गर्दी उसळली होती आंबेली येथून रस्त्यावर उतरून भाविक पायी चालत प्रवास करत कसईनाथ डोंगरावर जातात त्या ठिकाणी दर्शन घेऊन येतात या ठिकाणी गेल्यावर आपल्या मनोकामना पुर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे दिवसेंदिवस श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते मात्र श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असल्याने व नारळी पौर्णिमा असल्याने मोठी गर्दी झाली आहे या ठिकाणी अनेकांना निसर्ग पर्यटन पाहण्यासाठी पर्यटक येतात त्यामुळे भविष्यात या ठिकाणी सेवा सुविधा निर्माण करण्याची गरज आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे