मदत ग्रूप खेडच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

खेड(प्रतिनिधी) मदत ग्रूप खेड आणि प्रसाद गांधी मित्र मंडळ यांच्या वतीने जांबूर्डे मोरवंडे केंद्रातील निगडे बोरज नं. २ शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक श्री.राजेंद्र बेलोसे , सौ.कल्याणी कासार, स्वाती राठोड, विजय कासार यांच्या उपस्थितीत वही, पेन, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
 वंचित,  गरजू किंवा (आई किंवा वडील मृत किंवा एक पालकत्व ) अशा मुलांना  मदत योजनेतून मदत पोहचवली जात आहे याच पार्श्वभूमीवर हे मदत कार्य करण्यात आले.  या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद दिलीप गांधी, मनिष भोसले, विश्वनाथ गुरव, हेमंत पवार, श्रीकांत खोपकर, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.