प्रधान मंत्री क्षय मुक्त भारत योजने अंर्तगत तालुक्यातील रुग्णांना पौष्टीक धान्याचे वाटप

Distribution of nutritional food grains to the patients of Taluka under Pradhan Mantri Kshaya Mukta Bharat Yojana

मंडणगड | प्रतिनिधी : प्रधान मंत्री क्षय मुक्त भारत योजने अंतर्गत निक्षय मित्र म्हणून फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फौंडेशन रत्नागिरी यांच्या तर्फे भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयात 25 एप्रिल 2023 रोजी 31 क्षयरुग्णांना पोषण आहाराची मदत देण्यात आली. पोषण आहार वाटप कार्यक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके डॉ. प्रभाकर भावठाणकर डॉ. भगवान पितळे, डॉ. काळे डॉ. कारगल, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक श्री. तुपे तालुका मंडणगडचे पर्यवेक्षक श्री. पारधी व श्री. महाडिक, श्री. शिंदे तसेच ग्रामीण रुग्णालय सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.