कट्टा येथील  देशभक्ती पर गीतगायन स्पर्धेत उर्मी, सुजाता विजेत्या! 

 

मसुरे | झुंजार पेडणेकर     :बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने स्वर्गीय वामनराव काराणे स्मृति संगीत विद्यालयाच्या वतीने इयत्ता १ली ते ४थी व ५ वी ते ७ वी या दोन गटात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न झाली.

दोन्ही गटात ३२ स्पर्धकानी सहभाग घेतला. प्रारंभी दीपक भोगटे यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व स्पर्धकानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वाना धन्यवाद दिले.

गुरुनाथ ताम्हणकर यानी वैयक्तिक देशभक्तीगीत स्पर्धा किती चांगल्या प्रकारे होते हे स्पर्धकांनो दाखवून दिल्याबदल सर्वांचे कौतुक केले.

प्रवीण पारकर यानी साऱ्याच स्पर्धकानी अत्यंत परिश्रम केलेले दिसून येतात याचा आनंद वाटतो असे मत व्यक्त केले.

परीक्षक शंभू गोसावी यांनी मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करून मुलाना मौलीक सूचना केल्या.

परीक्षक ज्योतीराज केळूसकर यानी अत्यंत सुनियोजित पणे स्पर्धा यशस्वी केल्या बद्दल सर्वांचे कौतुक केले.

संगीत विद्यालयाचे संचालक अर्जून पेंडूरकर यानी अशा प्रकारे खुल्या गटात सुद्धा गायन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

निकाल पुढील प्रमाणे आहे.

१ली ते ४थी

प्रथम क्रमांक- उर्मी लक्ष्मीकिरण मेस्त्री

(मसुरे देऊळवाडा),

द्वितीय क्रमांक- दुर्वा भाऊ चिरमुले (कट्टा नं १), तृतीय क्रमांक – कार्तिक देवदास ढोलम( नांदोस गावकरवाडा)

उत्तेजनार्थ- खुशी गणेश वाईरकर (कट्टा नं १), गणेश संजय नांदोसकर (नांदोस सारंगवाडी), गौरेश विष्णू गावडे (साळेल), पियुष अमिर गावडे ( पेंडूर न १), मंथन सोनू पारकर (नांदोस सारंगवाडा),

इयत्ता ५ वी ते ७ वी गट – प्रथम क्रमांक सुजाता संतोष पार्टे (गुरामवाडी नं २),

द्वितीय- मधूर अर्जून पेंडूरकर (वराडकर हायस्कूल कट्टा)

तृतीय- प्रिया विलास पेंडूरकर (न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर), उत्तेजनार्थ- सिद्दी दशरथ गुराम (वराडकर हायस्कूल),निधी महेंद्र जांभवडेकर (गुरामवाडी नं २),

स्वराज समीर बागवे

(मसुरे देऊळवाडा),

प्रियेश प्रवीण उद्धव

(न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर), साचि अर्जून गावडे (तिरवडे).

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत स्पर्धकाना शैक्षणिक भेटवस्तू आणि प्रशस्ती पत्र तसेच सहभागीना प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आली

सेवांगणच्या कार्यवाह वैष्णवी लाड

यानी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.

ग्रंथपाल जांभवडेकर मॅडम व श्रीधर गौधळी यानी

कार्यक्रमाचे नियोजन केले.या कार्यक्रमास सेवांगण कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, दीपक भोगटे, अर्जून पेंडूरकर प्रविण पारकर शंभू गोसावी संगम चव्हाण गीता नाईक ज्योतीराज केळूसकर

हार्मोनियम वादक महेश तळगावकर, ढोलकीवादक भगवान काळसेकर, माईणकर मॅडम, संपदा भाट, झोरे मॅडम विद्यार्थी व पालक उपास्थित होते.