खेड(प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी वाहतूक मदत पोलीस केंद्रात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले समेळ विठ्ठल सुर्वे यांनी पोलीस दलात केलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते ‘महासंचालक’ पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत धामापूर येथे झालेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना अवघ्या दोन तासातच जेरबंद करण्याची कामगिरी त्यांनी
केली होती. मुरडव गावी झालेल्या खून प्रकरणातील संशयितासह तालुक्यातील शेरवली येथील खून प्रकरणातील संशयितालाही गजाआड करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना चोरी प्रकरणातील १० वर्षे फरारी वर्षे फरारी असलेल्या आरोपीला गजाआड करण्याची कामगिरी केली होती. खेड पोलीस ठाण्यात सेवा बजावताना खून प्रकरणातील आरोपीला पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती तसेच रत्नागिरी तुरुंगातून फरारी झालेल्या आरोपीला पनवेल येथून अटक करण्यासाठी त्यांची मोठी मदत झाली होती.









