कणकवली नप राज्यात प्रथम, व्यापारी संघटने कडून गौरव

First in Kankavli Nap state, Honored by Trade Association

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा कणकवली व्यापारी संघटनेकडून सत्कार

कणकवली : कणकवली नगरपंचायतने विविध उपक्रमा अंतर्गत व कर वसुली मध्ये नगरपालिका वर्गवारी राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल राज्य शासनामार्फत नुकताच कणकवली नगरपंचायत चा गौरव करण्यात आला. या बहुमनाबद्दल कणकवली तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्वच नगरसेवकांची भेट घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधुत तावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, उपाध्यक्ष राजू पारकर, विलास कोरगावकर, अमोल कामत, नंदू उबाळे, सुशील पारकर, हनिफ पिरखान, सुरबा गावकर, सतीश मसुरकर, आनंद पोरे, राजू गवाणकर, नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू गांगण, सचिन नलावडे आदींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.