चिपळूण (वार्ताहर) : शहरातील तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जंयती साजरी करण्यात आली . यावेळी तालुकाध्यक्ष लियाकत भाई शाह, यांनी मार्गदर्शन केले.
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कारकीर्द मध्ये उत्तम देशाचा कारभार केला. आजही जनमानसात त्यांचे नाव ओटावर आहे. त्यांच्या जयंती दिनी चिपळूण तालुका काँगेस पदाधिकारी यांनी कार्यालयात त्यांची जयंती साजरी केली. यावेळी
जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, टी.डी.पवार, संजय जाधव, मोहन मोरे,संदीप लवेकर ,दिपक निवाते ,जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव,मिनल गुरव, माजी नगरसेविका सफा गोठे,नंदा भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.












