आमदार नितेश राणे 21 व 22 ऑगस्ट रोजी वैभववाडी दौऱ्यावर

जि. प. लोरे व कोकिसरे मतदारसंघात गावभेट कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी
‘तुमचा आमदार तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत दिनांक 21 व 22 ऑगस्ट रोजी आमदार नितेश राणे यांचा वैभववाडी तालुक्यातील लोरे जिल्हा परिषद व कोकिसरे जिल्हा परिषद या दोन मतदारसंघात गाव भेट दौरा पार पडणार आहे. यावेळी आमदार नितेश राणे ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

गावभेट दौऱ्याची रुपरेषा पुढील प्रमाणे बुधवार दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. लोरे, गडमठ, आचिर्णे, खांबाळे, सांगुळवाडी, नावेळे, निमअरुळे, अरुळे, सडुरे व शिराळे या गावात गावभेट कार्यक्रम होणार आहे. तसेच गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. नाधवडे, नापणे, कोकिसरे, करुळ, कुंभवडे, सोनाळी, कुसुर, उंबर्डे, एडगांव असा गावभेट कार्यक्रम होणार आहे. तरी या गावभेट कार्यक्रमाला ग्रामस्थ, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.