गावभेट बैठकीत महिलांची मोठी गर्दी
विकास कामे आश्वासनपूर्ती बाबत नागरिकांनी मानले आ. नितेश राणे यांचे आभार
वैभववाडी l प्रतिनिधी : तुमचा आमदार तुमच्या दारी या उपक्रमांतर्गत लोरे जिल्हा परिषद मतदार संघात आमदार नितेश राणे यांच्या गावभेट दौऱ्याला सुरुवात झाली आहे. लोरे व आचिर्णे गावात या दौऱ्याला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
या गावभेट बैठकीत आमदार नितेश राणे यांनी जनतेशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टी व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी आमदार नितेश राणे यांचे दौऱ्यात आभार मानले. तसेच उपस्थित नागरिकांनी गावातील विकास कामे व इतर कामाबाबत चर्चा केली.
यावेळी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, प्राची तावडे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, रितेश सुतार, बंड्या मांजरेकर, रुपेश रावराणे, जयसिंग रावराणे, उत्तम सुतार, शारदा कांबळे, आदेश रावराणे, सुशील रावराणे व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत. गावागावात महिलांनी आमदार नितेश राणे यांना राखी बांधत शुभेच्छा दिल्या.








