तळवली हायस्कूलमध्ये रक्षा बंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

 

तळवली l वार्ताहर :     *पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली प्रशालेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.*

 

*त्यानिमित्त प्रशालेतील विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना राखी बांधून भाऊ व बहिण यांच्यातील नाते अतूट टिकवण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आलेले होते.हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.श्रीनाथ कुळेसर व इतर सहकारी शिक्षकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.*

 

*जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, जेष्ठ शिक्षिका सौ. नाईक मॅडम यांनी पौराणिक व ऐतिहासिक उदाहरणे देऊन त रक्षाबंधनाचे महत्त्व स्पष्ट केले. तर मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगुन शुभेच्छा व्यक्त केल्या.*

 

*यावेळी विद्यर्थिनीनी व महिला शिक्षिका यांनी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनाही राखी बांधली. तसेच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व कळावे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी प्रशालेच्या प्रांगणात असलेल्या वृक्षानाही राखी बांधली.*

 

*या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सुंदर केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, सांस्कृतिक विभाग व इतर सर्व सहकारी वृंद यांचे अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.*

 

*या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. कुळे सर, जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर, श्री.देवरुखकर सर, सौ.नाईक मॅडम,श्री.बागल सर,श्री.केळस्कर सर,श्री.गुरसळे सर श्री.गवळी सर, .प्रा.जड्याळ सर,श्री.पुनस्कर सर,सौ.कांबळे मॅडम,प्रा.आयरे मॅडम, सौ. जड्याळ मॅडम,प्रा.सावंत मॅडम यानी मेहनत घेतली… प्रा. अमोल जड्याळ सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.*