माजगाव येथे जलटाकी, वॉटर कूलर उद्घाटन व कुंभारवाडा शाळा दुरुस्तीचा शुभारंभ

माजगाव : ग्रामपंचायत माजगाव (१५ व्या वित्त आयोग निधीमधून) आरोग्य उपकेंद्र माजगाव येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बसविणे, पाणीपुरवठा सुरू करणे तसेच उपकेंद्रात वॉटर कूलर बसविणे आणि कुंभारवाडा येथील शाळेची दुरुस्ती या कामांचा शुभारंभ व उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. २४/०९/२०२५) रोजी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्षा सौ. रेश्मा रविकांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे आयोजन श्री. रिचर्ड अँथनी डिमेलो (सरपंच ग्रामपंचायत माजगाव) व श्री. आनंदराव लाडोजी परब (ग्रामपंचायत अधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

 

यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. ज्ञानेष सावंत, सौ. पूजा गावडे, श्री. अशोक धुरी, श्री. संजय कानसे, श्री. संतोष वेंगुर्लेकर, सौ. गीता कासार, सौ. मधु कुंभार, सौ. विशाखा जाधव, श्रीमती प्रज्ञा भोगण, सौ. उर्मिला मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. नव्या पाणीपुरवठा सुविधा, वॉटर कूलर आणि शाळा दुरुस्तीच्या कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.