माडखोल येथे सातारा येथील कामगाराची गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी । प्रतिनिधी : माडखोल येथे सातारा येथील कामगाराने गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. देविदास विठ्ठल रांजणे (वय ४२, रा. पाटण जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. तो तेथील सुशील मोरे यांच्या बागेत काम करत होता.
शुक्रवारी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत शेतात असलेल्या गोठ्यात आढळून आला. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, आत्महत्येचे कारण करू शकले नाही.काही दिवसांपूर्वी तो त्या ठिकाणी बागेत काम करण्यासाठी आला होता. आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे, श्री. राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तर याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.