देवगडमध्ये भव्य तिरंगा यात्रा; रविवारी सकाळी १० वाजता देवगड मंडळाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) – ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी देवगड मंडळाच्या वतीने शहरात भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

 

ही यात्रा रविवार, दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजता देवगड सातपायरी येथील उद्यान गणेश मंदिरापासून सुरु होणार असून, देवगड एस.टी. स्टॅन्ड येथे समाप्त होईल.

 

“भारत माता की जय, वंदे मातरम्” अशा राष्ट्रभक्तीपर घोषणांनी निनादत ही तिरंगा यात्रा मार्गक्रमण करणार आहे. देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवगड तालुका मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ यांनी केले आहे.

पडेल मंडळात तिरंगा यात्रा; माजी आमदार भाई गिरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजन

पडेल (प्रतिनिधी) – ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी पडेल मंडळाच्या वतीने माजी आमदार भाई गिरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.

ही यात्रा १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता पडेल कॅंटीनग येथून सुरू होईल आणि विजयदुर्ग येथे समाप्त होईल.

“भारत माता की जय, वंदे मातरम्” अशा देशभक्तीपर घोषणांनी निनादत ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सर्व देशप्रेमी नागरिकांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.