कुडाळ
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनीयमन अधिनियम 2014 अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता नियम 2016 मधील नियम 14 दोन अंतर्गत एकूण आठ पथविक्रेता यांच्या दिनांक 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पथ विक्रेते यांच्या समक्ष व मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कुडाळ तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या आरक्षण सोडतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. सर्वसाधारण प्रवर्गातून तीन पदसंख्या असून यापैकी एक महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जाती या प्रवर्गातून पदसंख्या एक असून महिला व पुरुषांकरिता राखीव आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून एक पदसंख्या असून महिला व पुरुष यांच्यासाठी राखीव आहे. इतर मागासवर्ग या प्रवर्गातून एक पदसंख्या असून महिलांसाठी राखीव आहे. अल्पसंख्यांक प्रवर्गातून एक पदसंख्या असून महिला व पुरुष असे राखीव आहे. विकलांग व दिव्यांग प्रवर्गातून एक पद संख्या असून ही जागा महिलांसाठी राखीव आहे. एकूण आठ पदसंख्या मध्ये ही आरक्षण सोडत निघाली आहे. याबाबत प्रेसनोट द्वारे मुख्याधिकारी कुडाळ यांनी जाहीर केले आहे.










