खेड (प्रतिनिधी) तालुक्यात भरणे गावात सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सभागृह मंजूर केले आहे. परंतु केवळ जागा उपलब्ध होत नसल्याचे कारण देत गेले वीस महिने हे सभागृह उभारण्यास दिरंगाई होत असल्याने खेड तालुका धनगर समाजातर्फे खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण गुरुवार २२ रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलकांनी स्थगित केले
उपोषणाच्या तिसन्या दिवशी खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे, गटविकास अधिकारी यशवंत भांड, अॅड. मिलिद जाडकर, डॉ. विलास शेळके यांनी धनगर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत चर्चा केली. त्यानंतर सभागृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी महसूल व ग्रामविकास विभाग एकत्र मिळून प्रयत्न करेल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर दिलेल्या पत्राचा मान राखून उपोषणकत्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यावेळी समाज संघटनेचे अध्यक्ष काळू गोरे व उपाध्यक्ष श्याम गवळी यांनी उपोषणाला पाठिबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.









