डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात 

 

 

मंडणगड / प्रतिनिधी : येथील मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात सुरवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सहा. प्रा. मंगेश ठसाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील टी. वाय. च्या विद्यार्थ्यानी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच पीपीटी सादरीकरण द्वारे महाविद्यालय सुरुवातीपासून ते आतापर्यंत महाविद्यालयाचा झालेला बदल याचा थोडक्यात आढावा घेतला.

त्यानंतर सहा. प्रा. अमोल राजेशिर्के यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कलागुणांचे कौतुक करून विद्यार्थी कसे भविष्यात उत्तुंग भरारी घेतील यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे सहा. प्रा. मंगेश ठसाळे, सायली घाडगे व ग्रंथपाल डॉ. दिगंबर हेमके तसेच महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.