कळझोंडी धरणात आढळला तरुणीचा बुडलेल्या अवस्थेत मृतदेह

 

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड येथील कळझोंडी धरणात तरुणीचा बुडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी दपारी 12.30 वा. सुमारास उघडकीस आली.

 

 

ॠणाली रविंद्र जोगळे (28) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वा. घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. तिचे नातेवाईक तिचा शोध घेत असताना शुक्रवारी दुपारी तीचा मृतदेह कळझोंडी धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात बुडालेल्या स्थितीत मिळून आला. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.