रस्त्यावरील खड्ड्यात रमलाय बालक : पालकांचे अक्षम्य दुर्लक्ष

 

 

वैश्यवाडा येथील प्रकाराबाबत नागरिकांमधून संताप 

सावंतवाडी । प्रतिनिधी : रस्त्यालगत गटाराचे काम करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांचा लहान मूलगा रस्त्यातच मध्यवर्ती पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात खेळत आहे. याबाबत संबंधितांना सूचना करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अलीकडेच मळेवाड येथील चिरेखाणीत अशाच प्रकारे तीन वर्षीय बालिकेचा मागे घेत असलेल्या डंपरचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला होता.

 

 

 

 

त्यामुळे परप्रांतीय कामगारांकडून आपल्या मुलांबाबत होत असलेल्या या हेळसांडीबाबत स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी केली आहे.